सामाजिक न्यायाचा पुरस्कार असो, पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन असो किंवा शिक्षण आणि संधींचा पुरस्कार असो, आम्ही आमच्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत..
आमचा दृष्टिकोन असा समाज निर्माण करणे आहे जिथे प्रत्येक व्यक्ती सन्मानाने, समानतेने आणि सुरक्षिततेने आपले जीवन जगेल. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि न्याय या मुलभूत गरजांची सहज पूर्तता होईल, आणि कोणीही उपेक्षित अथवा दुर्लक्षित राहणार नाही. सामाजिक बंधुत्व, आदर्श नागरी मूल्ये आणि सामूहिक प्रगती यांच्या आधारावर एक सुशिक्षित, सशक्त आणि समृद्ध समाज घडवणे हीच आमची खरी प्रेरणा आहे.
आमच्या सचोटीची, पारदर्शकतेची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. लोकांच्या समस्या ऐकून त्यांना योग्य तो न्याय देणे, गरजूंना मदत करणे, आणि सार्वजनिक हिताच्या कामात प्रामाणिकपणे योगदान देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जागरूक नागरिकांची फळी निर्माण करून सामूहिक ताकदीने प्रगतीचे नवीन मार्ग शोधणे व सामाजिक बदल घडवणे हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे.
मी एक अभिमानी आमदार म्हणून लढून आलो आहे पण मी एक गरिबांचा कार्यधारता म्हणून काम करण्यात इच्छुक आहे . तसेच माझ्या भागातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.
या दृष्टीकोन आणि ध्येयाचे पालन करून, आम्ही ज्या जनतेची सेवा करतो त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आणि आपल्या समाजाचे उज्वल भविष्य घडवण्यास कटिबद्ध आहोत.
आमच्या नवीनतम राजकीय वृत्तपत्रात आपले स्वागत आहे. वर्ष जसजसे पुढे जात आहे तसतसे राजकीय परिदृश्य विकास, आव्हाने आणि संधींसह विकसित होत आहे.
श्री 108 प.पु.आचार्य श्री.गुणधरनंदी मुनी महाराज यांच्या सानिध्यात ऐनापुर येथें भट्टारक मेळावा श्री.क्षेत्र ऐनापुर येथें प.पु.राष्ट्रसंत आचार्य श्री.108 गुणधरनंदी मुनीमहाराज यांच्या प्रेरणेने व समस्त श्री.भट्टारक महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या जैन समाज समावेश(संमेलन) या कार्यक्रमात उपस्थित राहिलो. यावेळी जैन समाज्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,श्रावक,श्राविका व इतर मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जयसिंगपूर येथील शिवस्मारक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलो. 💐 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सांगली येथील कृष्णा हॉल येथे दादासाहेब चुडाप्पा (D.Y.S.P) यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी माझा चुडाप्पा कुटुंबीयांकडून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे,प्रनील गिल्डा (D.Y.S.P मिरज),विपुल पाटील(D.Y.S.P विटा),.